MK Digital Line

नागपूर : राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार असून आठवड्याभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

केंद्र सरकारने १० लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेला सुरुवात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही रोजगार योजना राबवणार असल्याचं फडणवीस म्हणाले. नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

यावेळी फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा प्रकल्प आहे. आज ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत.आम्ही ठरवलंय की येत्या वर्षभरात महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना नोकऱ्या द्यायच्या. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही १८ हजार पोलिसांच्या भरतीची जाहिरातही येत्या आठवड्याभरात काढतो आहोत. 

मुख्यमंत्र्यांनी इतरही विभागांनाही निर्देश दिले आहेत. सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणावर तरुणाईला नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही आम्ही उपलब्ध करून देऊ', असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

Post a Comment

Previous Post Next Post