MK Digital Line
कंटू कोटनाके
जिवती/चिखली: आज दिनांक 28/09/2022 जिवती तालुक्यातील पाटण/ चिखली परिसरात बुधवारी सायंकाळी उशीरा विजेच्या कडकडाटासह  पाऊस झाला. या पावसात वीज पडून 2 महिलांची मृत्यू झाला.

चिखली येथे राहणारे सौ.वंदना चंदू कोटनाके (३५), सौ. भारुला अनिल कोरांगे (३२)  यांचा जागीच मृत्यू  झाला.  आणि जखमी 3 जण आहेत. सौ. वंदना कोटनाके यांना १ मुलगा, १ मुलगी, आणि भारुला कोरांगे यांना १ मुलगा आहेत. कु. सुरेखा जागेराव वेडमे ही जखमी आहे.

सायंकाळी शेतीचा काम करून सायंकाळी घरी परत येत असतांना ते एकूण ५ महिला व मुली होते. त्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरू झाला. २ महिलांचा यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ३ जखमींना पाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post