MK Digital Line
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आता राज्य सरकार वर्षाला सहा हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेच्या धर्तीवर राज्यात देखील 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू होणार आहे. या योजनेअतर्गंत प्रत्येक वर्षाला पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार आहेत. 

शेतकऱ्यांसाठी 2018 ला केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली. केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. केंद्र सरकार दोन हजार रुपयांचे तीन हप्ते करत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जामा करतं. 

दरम्यान, आता याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान योजनेअतर्गंत वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार आहेत. राज्यात ही योजना लवकरच लागू केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post