MK Digital Line
इंस्टाग्रामने रिल्ससाठी असलेली ६० सेकंदाची मर्यादा वाढवून आता ९० सेकंड केली. तसेच मेटाने इंस्टाग्राम रील्स व फेसबुक रील्सवर बऱ्याच नव्या क्रिएटिव्ह टूल्सचा समावेश केला आहे.

आता इंस्टाग्रामवरील रील्समध्येही स्टोरीप्रमाणे विविध स्टीकर्स वापरुन प्रेक्षकांसोबत अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकता.

▪️ ९० सेकंदांच्या रील्स : आधीच्या ६० सेकंदाची मर्यादा वाढवून आता ९० सेकंद करण्यात आली आहे.
▪️ रील्समध्येही स्टीकर्स वापरता येणार : आजवर स्टोरीमध्ये उपलब्ध असलेले विविध स्टीकर्स आता रील्समध्ये वापरुन पोल, क्विज, इ. गोष्टी करता येतील!
▪️ इम्पोर्ट ऑडिओ : स्वतःची ऑडिओ फाइल गॅलरीमधून इम्पोर्ट करून ती रीलला जोडता येईल.
▪️ टेम्प्लेटस : एखादी आवडती रील पाहून त्यानुसार स्वतःच्या रील्स तयार करणं टेंप्लेट्समुळं सोपं होईल. तयार टेंप्लेट मध्ये आपला कंटेंट टाकून लगेच रील्स तयार करता येतील.

Post a Comment

Previous Post Next Post