MK Digital Line
अ‍ॅपलने काल आपल्या 'Peek Performance' इव्हेंटच्या माध्यमातून नवीन iPhone SE (2022) सादर केला आहे. यामध्ये फ्लॅगशिप iPhone 13 Series मधील A15 Bionic चिप देण्यात आली आहे.

हा कॉम्पॅक्ट फोन 5G कनेक्टिव्हिटीसह फर्स्ट टाईम युजर्सना आकर्षित करण्यासाठी सादर करण्यात आला आहे. Apple iPhone SE (2022) ची किंमत यूएसमध्ये 429 डॉलर म्हणजेच जवळपास 33,000 रुपये आहे.

परंतु भारतीयांना मात्र या फोनच्या 64GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलसाठी 43,900 रुपये मोजावे लागतील. डिवाइस 128GB आणि 256GB स्टोरेज मॉडेलमध्ये देखील येतो.

iPhone SE (2022) भारतात 11 मार्चपासून प्री-ऑर्डर करता येईल तर 18 मार्चपासून याची विक्रीत सुरु होईल. Apple iPhone SE (2022) ची डिजाईन जुन्या iPhone 8 सारखी आहे. या आयफोनच्या बॅक आणि फ्रंटला देण्यात आलेली ग्लास कोणत्याही स्मार्टफोनमधील सर्वात मजबूत ग्लास आहे.

सिक्योरिटीसाठी यामध्ये Touch ID देण्यात आली आहे. तसेच यातील IP67 रेटिंग पाणी आणि धुळीपासून वाचवते. हा डिवाइस Red, Black आणि White कलर ऑप्शन्समध्ये विकत घेता येईल.

Apple iPhone SE (2022) मध्ये गेल्यावर्षी आलेल्या फ्लॅगशिप iPhone 13 सीरिजच्या A15 Bionic प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या पावरफुल चिपसेटसह कंपनीनं 5G कनेक्टिव्हिटी देखील दिली आहे.

हा फोन iOS 15 वर चालेल, तसेच यात फोकस मोडसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनच्या मागे 12MP चा सिंगल कॅमेरा आहे, जो Deep Fusion, Smart HDR 4 आणि फोटो स्टाईलला सपोर्ट करतो. यामध्ये चांगली व्हिडिओ रेकॉर्डिंग क्वॉलिटी मिळेल, असा दावा कंपनीनं केला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post