MK Digital Line
चंद्रपुर: कोरपणा नगर पंचायतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. 60 वर्षापासून एकहाती सत्ता असलेल्या बावणे कुटूंबाला शह देण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, शेतकरी संघटनेने आघाडी उघळली. मात्र काँग्रेसचा नेतृत्वात बहूमत मिळवीत पुन्हा एकदा बावणे कुटूंबीय ल 'किंग' ठरला आहे. कोरपणा ग्रामपंचायतेची स्थापणा १९६२ ला झाली. स्थापनेपासून बावणे कुटुंबीयांची कुटूंबियाची येथे सत्ता होती. 

प्रथम सरपंच चिंतामनराव बावणे १९६२ ते १९८४ पर्यंत म्हणजे २० वर्ष  नेतृत्व केले. या दरम्यान १९७५ ते १९७७ हा दोन वर्ष आणीबाणीचा काळ होता. १९८४ मध्ये ते आजारी असताना त्यांच्या पुढाकारातून पाच वर्ष भाऊराव कारेकर यांना सरपंच पदाची धुरा सोपविल्या गेली. १९८९ पासून जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे यांच्या नेतृत्वात येथील सत्तेवर बावणे कुटूंबियांचा वरचष्मा राहीला. कोरपणा नगर पंचायत सन 2016 मध्ये जाहीर झाली. त्यावेळीही बावणे कुटूंबियांनी येथे सत्ता मिळविली. 

बावणे पिता - पुत्रांनी ५३ वर्ष सत्तेवर होते. आता पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीत बावणे कुटूंबियांची सत्ता स्वतकडे खेचण्यासाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, शेतकरी संघटनेने आघाडी उघळली होती. मात्र बावणे कुटूंबियांचा गड त्यांना हलविता आला नाही. नगर पंचायतेचा 17 जागेपैकी काँग्रेसचा नेतृत्वाखाली बावणेनी 12 जागा मिळविल्या. आघाडीला केवळ 5 जागेवर समाधान मानावे लागले.

आमदार सूभाष धोटेचां नेतृत्व सिध्द

राजूरा विधानसभा क्षेत्रातील कोरपणा, जिवती, गोंडपिपरी या तीन नगर पंचायतेचा निवडणुका पार पडल्या. राजूरा विधानसभेचे आमदार सूभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने या तीन नगर पंचायतीत चांगली कामगीरी बजावली. कोरपण्यात बहूमत मिळविले तर जिवती, गोंडपिपरी येथे मोठा पक्ष ठरला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post