MK Digital Line
▪️ सध्याच्या काळात सोशल मिडीयाच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या पाठीवर कोठेही असलेल्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकता, खासगी जीवनातील गोष्टी शेअर करू शकता.
▪️ सध्या वैविध्यपूर्ण फीचर्स असलेले अनेक इन्स्टंट मेसेजिंग ॲप उपलब्ध आहेत. परंतु, व्हॉट्सॲप हे ॲप सर्वाधिक लोकप्रिय मानलं जातं. 
▪️ गेल्या काही काळापासून युजर्सच्या प्रायव्हसीच्या अनुषंगानं व्हॉट्सॲपवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. यातून अनेक युजर्सनं व्हॉट्सॲपऐवजी अन्य पर्यायी ॲप्सचा वापर सुरू केला.
▪️ ही बाब लक्षात येताच व्हॉट्सॲपनं तातडीनं पावलं उचलत युजर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यावर भर दिला. लवकरच यातील पुढचं पाऊल व्हॉट्सॲप टाकत आहे. 
▪️ नव्या फिचर्सच्या माध्यमातून व्हॉट्सॲप हे खरंच एंड-टू-एंड इनक्रिप्टेड आहे, हे स्पष्ट करण्यावर कंपनीचा भर असेल. विशेष म्हणजे या नव्या फिचर्सवर काम देखील सुरू झालं आहे.
▪️ मेटाच्या मालकीचं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सॲप एका नव्या फिचरवर काम करत आहे. या नव्या फिचरमुळे हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप खरंच एंड-टू-एंट इनक्रिप्टेड आहे हे अधिक स्पष्ट होईल. 
▪️ व्हॉट्सॲपवरील कॉल्स एंड-टू-एंड इनक्रिप्टेड असल्याची माहिती देण्यासाठी हे अ‍ॅप दोन नवे इंडिकेटर्स आणणार आहे. हे नवे इंडिकेटर्स लवकरच कॉलिंग स्क्रिनवर आणि आयओएसच्या व्हॉट्सॲप व्हर्जनवरील स्टेटस स्क्रिनवर दिसणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post