MK Digital Line
● कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता शासनाने निर्बंधांबाबत हालचाली सुरु केल्या असून राज्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
● मुंबईत निर्बंध घालण्यात आल्यानंतर आता राज्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
● राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पर्यटन ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. ही नियमावली ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
● अशी आहे नियमावली!
1. विवाहाच्या बाबतीत, मग ते बंदिस्त जागेत असो किंवा मैदान असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
2 सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
3. अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल
4. राज्याच्या कोणत्याही भागात जे पर्यटन स्थळे किंवा इतर ठिकाणे आहेत जे समुद्रकिनारे, मोकळी मैदाने जिथे गर्दी होण्याची शक्यता आहे तिथे स्थानिक प्रशासनाला १४४ लागू करण्याचा अधिकार
5. आधीच अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचनाही लागू राहतील
Post a Comment