MK Digital Line
गुगल पे आपल्या पेमेंट अॅप गुगल पेमध्ये सुधारणा करत आहे. अशातच आता माऊंटेन व्यूच्या दिग्गज कंपनीने गुगल पे युजर्ससाठी फिक्स डिपॉझिट सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी कंपनीने एका लहान आर्थिक बँकेसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता स्वतंत्रपणे बँकेत खाते सुरु करण्याऐवजी थेट गुगल पे अॅपच्या माध्यमातून एफडी सुरु करता येणार आहे.
गुगलने चेन्नईतील इक्विटास स्मॉल फायनान्स बँकसोबत भागीदारी केली आहे. त्यांच्या माध्यमातून नागरिकांना बँक खात्याशिवाय थेट एफडीचे बेनिफिट्स दिले जाणार आहेत.
यासाठी इच्छुक युजर्सला आता गुगल पे वर एफडी सुरु करता येईल. यासाठी नागरिकांना वर्षभरासाठी 6.35 टक्के व्याज सुद्धा दिले जाणार आहे.
Equitas SFB यांच्या मतानुसार फिनटेक इंन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन सेतु द्वारे विकसित APIs चा लाभ घेत डिजिटल FD सर्विस सुरु करणार आहोत.
आता गुगलसोबत पार्टनरशिप करत बँक गुगल पेच्या माध्यमातून देशभरात सर्विस देणार आहे. आता गुगल पे वर एफडी बुक करण्यासाठी तुम्हाला बिझनेस अॅन्ड बिल्स सेक्शन अंतर्गत इक्विटास स्मॉल फायनान्स बँक सर्च करावे लागणार आहे.
त्यानंतर तुन्हाला KYC डिटेल्स द्यावे लागणार आहेत. तर गुगल पे च्या UPI चा वापर करुन तुमच्या FD साठी पेमेंट करावे लागेल.
एफडी सुरु केल्यानंतर तुम्हाला थेट गुगल पेवर ती ट्रॅक करता येणार आहे. या व्यतिरिक्त जसे पेमेंट अॅपचा वापर करुन अधिक FD काढली तरीही ते ट्रॅकिंग पेजवर तुम्हाला दिसणार आहे.
दरम्यान, मॅच्युरिटी रक्कम आपोआप गुगल पे वापरकर्त्यांच्या गुगल पे लिंक केलेल्या बँक खात्यात जाईल. या व्यतिरिक्त ट्रँकिंग पेजवर तुम्ही वेळेपूर्वीच एफडी मोडण्यासाठी सुद्धा अर्ज करु शकणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Post a Comment