MK Digital Line
गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस' धावणार आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ही घोषणा केली आहे.
नितेश राणे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हा प्रवास मोफत असणार असून त्यासाठी आरक्षण करावं लागणार आहे.
काय म्हणाले नितेश राणे? :
“दरवर्षी मी आपल्यासाठी गणपतीला बसेस सोडतो. पण यावर्षी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी 'मोदी एक्स्प्रेस' सोडत आहोत,” अशी माहिती नितेश राणे यांनी दिली.
दरम्यान, १८०० नागरिकांसाठी ही ट्रेन सोडण्यात येणार असून दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन ही ट्रेन सुटणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली. तसेच प्रवासात एक वेळचं जेवण देखील दिलं जाणार आहे.
Post a Comment