MK Digital Line
● अखेरीस Battlegrounds Mobile India गेम भारतीयांसाठी अधिकृतपणे उपलब्ध झाला आहे. 

● भारतीय अँड्रॉईड युजर्स प्ले स्टोरवर जाऊन आजपासून PUBG चा भारतीय अवतार म्हणजे Battlegrounds Mobile India डाउनलोड करू शकतात.

● आज 2 जुलै सकाळी 6 वाजून 30 मिनीटांनी Battlegrounds Mobile India भारतात अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. 

● सध्यातरी या गेमचा आनंद फक्त अँड्रॉईड युजर्सना घेता येईल. आयओएस युजर्सना अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे. 

अशाप्रकारे करा डाउनलोड : 

● तुम्ही Battlegrounds Mobile India चा अधिकृत व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला Play Store वर जावे लागेल.

● प्ले स्टोरमध्ये 'Battlegrounds Mobile India' असं सर्च करा. त्यानंतर हा गेम तुमच्या फोनमध्ये इंस्टाल करा. 

● जर तुमच्या फोनमध्ये गेमचा अर्ली अ‍ॅक्सेस व्हर्जन असेल तर हा गेम अपडेट करण्याचा पर्याय देण्यात येईल. 

● गेम अपडेट केल्यावर तुम्ही बीटा व्हर्जनवरून अधिकृत व्हर्जनवर अपडेट व्हाल.

● हा गेम स्मार्टफोन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये Android 5.1.1 च्या वरील ऑपरेटिंग सिस्टम असणे आवश्यक आहे. 

● तसेच फोनमध्ये कमीत कमी 2GB रॅम असावा, असे डेव्हलपर कंपनी क्रॉफ्टनने सांगितले आहे. 

● BGMI च्या अधिकृत गेम फाईलची साईज 721MB आहे. हा गेम 18 जून रोजी बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध झाला होता.

● बीजीएमआयच्या अर्ली अ‍ॅक्सेस वर्जनचे 50 लाख डाउनलोड पूर्ण झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post