MK Digital Line
सुपरहिट तमिळ फिल्म 'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान एकत्र दिसणार आहेत. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे पुष्कर आणि गायत्री हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

'विक्रम वेधा' या तमिळ चित्रपटात आर माधवन आणि विजय सेथूपती मुख्य भूमिकेत होते आणि आता हिंदीमध्ये सैफ - हृतिक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे

याबाबत माहिती देताना मार्केटिंग अनालायझर तरण आदर्श यांनी ट्विट केले की, 'हृतिक आणि सैफ विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसतील. तमिळ चित्रपट दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचे दिग्दर्शन करणार आहेत. 

त्यामुळे आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल कारण कोरोनाच्या काळात. चित्रपटांच्या शूटिंग वेळो वेळी लांबणीवर पडत आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post