MK Digital Line
गुगल युजर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. गुगलने आपले एक जूने फीचर लवकरच बंद करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. 

ते म्हणजे, गुगल बुकमार्क्स मागील १६ वर्षांपासून सुरु असलेले हे फिचर येत्या 30 सप्टेंबर 2021 पासून बंद केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

गुगल बुकमार्क्स'च्या पेजवरील बॅनरवर याबाबत सूचना दिली आहे. Google Bookmarks ही 16 वर्षे जुनी आणि फारशी लोकप्रिय नसलेली सुविधा सर्व युजर्ससाठी बंद केली जाणार आहे.

बुकमार्क्ससवरील सर्व डेटा गुगलने युजर्सला 'एक्सपोर्ट' (Export) करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

त्यासाठी युजर्सने google.com/bookmarks वर जात Export Bookmarks वर क्लिक करावं. त्यानंतर युजर आपला डेटा कॉपी करु शकणार आहे. ही सुविधा बंद होणार असल्याने त्याचा परिणाम गुगल मॅप्सवरही (Google Maps) होण्याची शक्यता आहे.

गुगल बुकमार्क्स बंद झाल्यावर गुगल मॅप्सवरील काही फीचर्सबाबत अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण हे फीचर बुकमार्क्सशी संबंधित आणि सिंक केलेले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post