MK Digital Line
मनोरंजन क्षेत्रात आघाडीवर असणारी हिंदी सीरिअल 'तारक मेहता का उलटा चष्मा' प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
गेल्या 13 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
या मालिकेतील बाप- लेकाची भूमिका करणारे पात्र जेठालाल (दिलीप जोशी) व टप्पू (राज अंदकत) यांच्यामध्ये दुरावा आला आहे.
जेठालाल त्यांचा ऑन-स्क्रीन मुलगा टप्पू याच्यावर खऱ्या आयुष्यात देखील खूप रागावले आहे.
या कारणामुळेच, त्यांनी इंस्टाग्रामवर ‘टप्पू’ म्हणजेच राज अंदकतला अनफॉलो केले आहे.
हे आहे वादाचे कारण
ज्येष्ठ अभिनेते असूनही दिलीप जोशी नेहमीच सेटवर वेळेवर पोहोचतात, तर राज अनेकदा सांगूनही नेहमी सेटवर उशीरा येतो.
हा प्रकार बर्याच दिवसांपासून सुरू आहे आणि दिलीप जोशी यांना देखील राजमुळे शूटसाठी थांबून राहावे लागते.
याच कारणामुळे दिलीप जोशी रागावले आहेत आणि त्यांनी राजला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे
Post a Comment