MK Digital Line
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आणखी नवीन फिचर आणले आहे. त्यामुळे आता फेसबुकद्वारे पेमेंट देखील करता येणार आहे. मेसेंजरमध्ये ३ नवे फीचर्स सामिल केले आहेत. या फीचर्समध्ये क्यूआर कोडसह पेमेंट क्विक रिप्लाय बार आणि नव्या चॅट थीम्स असणार आहेत.

अमेरिकेत फेसबुक मेसेंजरद्वारे पेमेंट करण्याची सुविधा आधीच चालू करण्यात आली आहे. या फीचरचा वापर करुन युजर आपल्या मेसेंजरद्वारे क्यूआर कोड स्कॅन करुन दुसऱ्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करू शकतो.

यासाठी युजरला फेसबुक किंवा दुसरं कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज लागणार नाही. तसंच पेमेंट करताना कोणत्याही कॉन्टॅक्टला अ‍ॅड करावं लागणार नाही.

याचा वापर करण्यासाठी युजरला मेसेंजर सेटिंगमध्ये फेसबुक पे द्वारे आपला क्यूआर कोड दुसऱ्या व्यक्तीला पाठवावा लागेल, जिथे पैसे पाठवायचे आहेत किंवा ज्याच्याकडून घ्यायचे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post