MK Digital Line
न्यूझीलंडने बलाढ्य भारताला ८ गड्यांनी पराभूत करत पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. नाणेफेक जिंकलेल्या न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. 

पहिल्या डावात भारताला २१७ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर आटोपला. 

दुसऱ्या डावात न्यूझीलंडने भारताला १७० धावांवर गुंडाळले. राखीव दिवसापर्यंत न्यूझीलंडला भारताकडून ५३ षटकात १३९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. 

लॅथम आणि कॉन्वे लवकर माघारी परतल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. 

सामनावीर : पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात २ बळी घेणाऱ्या न्यूझीलंडच्या काईल जेमीसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला विजेता होण्याचा मानही न्यूझीलंडला मिळाला.

Post a Comment

Previous Post Next Post