MK Digital Line
कोरोना काळात जगभरातील कर्मचाऱ्यांना आणि पर्यायाने कंपन्यांना देखील वर्क फ्रॉम होमचा पर्याय वरदान ठरला आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा खर्च कमी झाला तर कंपन्यांचा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च वाचला आहे.
सर्च इंजिन गुगलला देखील वर्क फ्रॉम होमचा तब्बल 7400 कोटींचा फायदा झाला आहे.
गुगलची पेरंट कंपनी अल्फाबेटने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या तिमाहीत प्रमोशन, प्रवास, मनोरंजन यावर होणाऱ्या खर्चात 1980 कोटी व एकूण वर्षभरात 7400कोटींची बचत झाली आहे.
मसाज टेबल, कॅटरेड क्युझींस, कार्पोरेट रिट्रीट यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना भत्ते देते. गेल्या वर्षभरात हे भत्ते दिल्याने कंपनीचा खर्च कमी झाला आहे.
Post a Comment