MK Digital Line
• भारतीय संघ आगामी 2022 फिफा वर्ल्डकपसाठीचे क्वालिफायर सामने खेळण्यासाठी कतार देशातील दोहा येथे पोहचला आहे .

• यावेळी संघ 2023 मध्ये होणाऱ्या आशियाई चषक पात्रता फेरीचे उर्वरित सामने देखील खेळणार आहे.

• भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त झाल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली 28 सदस्यीय भारतीय फुटबॉल संघ दोहाच्या बायो-बबल मध्ये सराव शिबिरात भाग घेईल.

• कतारच्या दौऱ्यासाठी आवश्यक हेल्थ प्रोटोकॉलनुसार, कोरोनाच्या आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह अहवाल घेऊन 48 तासात सर्व खेळाडू आणि कर्मचारी तिथे पोहचले आहेत. हे खेळाडू 15 मेपासून राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे बायोबबलमध्ये राहत होते.

Post a Comment

Previous Post Next Post