MK Digital Line
महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध? या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा पाहायला मिळाली. 

महाराष्ट्रात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. तसेच राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. 

या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी उद्या संध्याकाळपासून आपण 'ब्रेक द चेन' लागू करत आहोत, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्यापासून राज्यात 144 कलम लागू होणार आहे, याचा अर्थ पुढचे किमान 15 दिवस राज्यात लॉकडाऊन असणार आहे.


काय आहे ''ब्रेक द चेन''ची नियमावली 

● राज्यात कलम 144 लागू असणार.
● सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार.
● रस्त्यावर खाद्यविक्रीला परवानगी राहणार.
● लोकल ट्रेन आणि बस सेवा सुरू राहणार.
● शिवभोजन थाळी गोरगरिबांना मोफत मिळणार. 
● हॉटेल्स, रेस्टॉरंट्सची होम डिलिव्हरी सेवा सुरु. 
● खाद्य विक्रेत्यांनीही पार्सल व्यवस्था सुरु ठेवावी.
● पाणीपुरवठा, शेतीची काम करण्यास मुभा.
● इलेक्ट्रिक, गॅस पुरवठा, एटीएम सुरु राहतील.
● घरोघरी वर्तमानपत्रांचं वाटप सुरु राहतील.
● सिनेमागृह, चित्रिकरण बगीचे, व्यायामशाळा बंद. 
● मेडिकल, किराणा दुकाने सुरू राहणार.
● बँकिंग व त्यासंदर्भातील सेवा सुरू राहणार.

● औद्याेगिक क्षेत्रातील उद्याेग धंदे सुरू राहणार.
● गरजूंना एका महिन्यासाठी तीन किलाे धान्य माेफत.
● परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदत. 
● नाेंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपये अर्थसाह्य.
● अधिकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये. 
● परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार.
● आदिवासींना प्रती कुटुंब दाेन हजार रुपये अर्थसाह्य. 
● फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच प्रवास करता येणार.
● इतर व्यक्तींना बाहेर पडण्यास किंवा प्रवास करण्यास निर्बंध.
● सार्वजनिक वाहतूक सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच उपलब्ध. 
● इमर्जन्सी वगळता खासगी वाहतुकीला प्रतिबंध.
● सिनेमा हॉल, मॉल्स, सलून बंद राहणार.

Post a Comment

Previous Post Next Post