MK Digital Line
चंद्रपुर : शासकीय आदिवासी वस्तीगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांची रखडलेली डीबीटीची रक्कम तात्काळ अदा करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेवून केल्या आहे. यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी रोहण घूगे, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, नितेश बोरकुटे, प्रा. हितेश मडावी, शुभम उईके, मनोहर मेश्राम, शुभम मडावी यांच्यासह आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
शासकीय आदिवासी वस्तीगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांची जेवणाची सोय व शैक्षणीक साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाच्या वतीने डिबीटी च्या माध्यमातून आर्थिक मदत केल्या जात असते प्रवेशाच्या सात दिवसा आत ही रक्कम सदर विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षीत आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता शैक्षणिक साहित्य व जेवणाची सोय याकरिता शासन धोरणानुसार डिबीटी ची रक्कम प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना जवळपास महिन्याभराचा कालावधी लोटूनही दिल्या गेलेली नाही.
त्यामुळे अपेक्षित शैक्षणिक साहित्य व भोजन व्यवस्था याचा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामूळे ही मदत सदर विद्यार्थ्यांना तात्काळ देण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिले आहे.
Post a Comment