MK Digital Line
चंद्रपुर : विद्यार्थ्यांची सुरु असलेली अंतिम परिक्षा लक्षात घेता आदिवासी शासकीय वसतिगृह कोविड - 19 करिता हस्तांरित करु नका अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या आहे. काल शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत या संदर्भात चर्चा केली असून सदर सुचना केल्या आहे. 

आर्थिकदृष्ट्या गरिब असलेल्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या निवासाकरीता शासकीय वसतिगृह पर्याय आहे. त्यातच आता अंतिम सत्राची परिक्षा सुरु आहे. अशा वेळी हे वसतिगृह कोविड -19 करीता हस्तांरित केल्या गेल्यास येथे राहत असलेल्या विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊन त्यांचे शैक्षणीक नुकसाण होण्याची शक्यता आहे. मागील शैक्षणीक सत्रात सुध्दा जवळपास 10 महिणे वसतीगृह विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध नव्हते.



मात्र शासन निर्णयानूसार आता वस्तीगृह उपलब्ध करुन देण्यात आले असून नियमीत शैक्षणीक अध्यापन सुरु आहे. त्यामूळे आता पून्हा हे वस्तीगृह कोविड - 19 करिता हस्तांतरीत केल्यास विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण होऊ शकते ही बाब लक्षात घेता वस्तीगृह कोविड - 19 करिता हस्तांतरीत करु नये अशा सूचना यावेळी करण्यात आल्या आहे.

Post a Comment

Previous Post Next Post