MK Digital Line
● छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी गेल्या काही दिवसांपासून मालिकेपासून लांब आहे. 

● पण चाहते तिची आतुरतेने वाट पाहात होते. दिशा वकानी पुन्हा कधी मालिकेत दिसणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

● अशातच दिशाने मालिकेला कायमचा रामराम ठोकला असल्याचे समोर आले आहे.

● 2017 मध्ये दिशा मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. तेव्हापासून ती तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. 

● आता दिशाने मालिकेचा कायमचा निरोप घेतला असल्याचे समोर आले आहे.

● कोईमोईने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून दिशा मालिकेत पुन्हा दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 

● योग्य वेळेची वाट पाहत असल्याचे म्हटले जात होते. दिशा आणि मालिकेचे निर्माते यावर चर्चा देखील करत होते. पण आता दिशाने मालिकेला रामराम ठोकला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post