MK Digital Line
‘टेस्ला’ या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनीचे सीईओ एलन मस्क आता भारतात रिलायन्स जिओ आणि अन्य टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत.

एलन मस्क यांची दुसरी कंपनी स्टारलिंक लवकरच भारतात इंटरनेट सेवा सुरू करणार आहे.

सॅटेलाइट्सद्वारे ही कंपनी हाय-स्पीड इंटरनेट सेवा पुरवणार आहे.

प्री-बूकिंगसह रजिस्ट्रेशनला सुरूवात
भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी स्टारलिंक इंडियाची वेबसाइट लाइव्ह झाली असून बूकिंगलाही सुरूवात झाली आहे. 

www.starlink.com या लिंकवर जाऊन तुम्ही प्री-बूकिंग करु शकतात. 

स्टारलिंक इंटरनेटसाठी प्री-बूकिंग सध्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये सुरूवात झाली आहे.

किती असणार दर?
प्री-बूकिंगसाठी 7 हजार 300 रुपये सिक्युरिटी म्हणून द्यावे लागतील.

हे पैसे राउटर आणि अन्य बाबींसाठी असतील. पेमेंट झाल्यानंतर तुमच्या लोकेशनवर बूकिंग कन्फर्म होईल. 

सिक्युरिटी म्हणून दिलेले पैसे 100 टक्के रिफंडेबल आहेत, म्हणजे बूकिंग केल्यानंतरही तुम्ही बूकिंग रद्द करु शकतात, तुम्हाला सर्व पैसे परत दिले जातील.

स्पीड किती ?
दरम्यान, सुरूवातीला बीटा टेस्टिंगदरम्यान ग्राहकांना 50-150Mbps चा स्पीड मिळेल.

टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर 300Mbps पर्यंत स्पीड मिळेल असं मस्क यांनी यापूर्वी सांगितलं होतं. स्टारलिंक द्वारे जगभरात इंटरनेट सेवा देण्याची मस्क यांची योजना आहे.

Post a Comment

Previous Post Next Post