MK Digital Line
पेट्रोलच्या महागाईमुळे आता बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहे. 

Ola Electric Scooter :

ओला लवकरच भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.50 लाख असण्याची शक्यता आहे.

Okinawa Cruiser :

ही स्कूटरही बाजारात लवकरच लाँच होणार असून ही स्कूटर एका तासाला 100 कि.मी प्रती वेगाने धावू शकते. या स्कूटरची 2 ते 3 तासात संपूर्ण बॅटरी चार्ज होते. या गाडीत 3KWची ब्रशलेस मोटर आहे. 

Hero Electric Scooter AE-29 :

हिरो इलेक्ट्रिक स्कूटर या गाडीत 55 कि.मी वेगाने धावण्याची क्षमता आहे. गाडीला पॉवर देण्यासाठी लाईट वेट पोर्टेबल लिथीयम आयन 48/3.5 kWh बॅटरी आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 85,000 रुपये असू शकते. 

दरम्यान, येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक स्कूटर्सला भारतीय बाजारात प्रचंड वाव येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post