MK Digital Line
▪️ एका दाम्पत्यामध्ये चक्क अंड्यावरून वाद झाला. फक्त वाद झाला नाही तर हे भांडण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.

▪️ बुलडाण्यातील साखरखेडा गावातील पती-पत्नी दोघांमध्ये तीन अंड्यांवरून भांडण झाली. 

▪️ दोघंही एकमेकांविरोधात तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेले. या भांडणाचे कारण ऐकून पोलिसांनाही आश्चर्य वाटले. 

● सविस्तर असे की,


▪️ पतीने बाजारातून कोंबडीची तीन अंडी आणली आणि बायकोला बुर्जी बनवायला सांगितली. 

▪️ नवरा बुर्जी खायला आला तेव्हा त्याला बुर्जी मिळाली नाही. यावर पत्नीने सांगितले आपण तिन्ही अंड्यांची बुर्जी बनवली. 

▪️ पण ती आपल्या मुलीला खायला दिली आणि मग काय यावरूनच नवरा-बायकोत जुंपली.

▪️ त्यांच्यातील हे भांडण इतके वाढले की पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी हा वाद अनोख्या पद्धतीने सोडवला.

▪️ पोलिसांनी बाजारातून तीन अंडी विकत आणून त्या पती-पत्नीला दिले, आणि भांडण मिटवले.

Post a Comment

Previous Post Next Post