MK Digital Line
भारतात नेव्हिगेशनसाठी बहुतांश युजर्स गुगल मॅपचा वापर करतात. पण ही सेवा इंग्रजीत असल्याने इंग्रजी न समजणाऱ्या युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत होता.
पण, आता कंपनीने युजर्सच्या आवश्यकतेनुसार यामध्ये काही बदल करण्याची घोषणा केली आहे. यानुसार आता ही सेवा मराठी भाषेतही उपलब्ध होणार आहे.
जगात सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो, त्यामुळे भारतीय नेटकऱ्यांच्या गरजांकडेही विशेष लक्ष दिलं जातं.
त्यामुळे गुगलनेही भारतीय युजर्सच्या गरजा आणि त्यांच्या समस्या लक्षात घेऊन गुगल मॅपमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
स्थानिक भाषेत गुगल मॅपची सेवा सुरू झाल्यामुळे इंग्रजी न समजणाऱ्या युजर्सना एखादा पत्ता वगैरे शोधताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
गुगल मॅपची सेवा आता मराठीसोबतच हिंदी, गुजराती, बंगाली, मल्ल्याळी, कानडी, पंजाबी, उडिया, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्येही वापरता येणार आहे.
Post a Comment