MK Digital Line
जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. 

ही पॉलिसी 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे अनेक युजर्स नाखुश आहेत. 

त्यामुळे युजर्स आता व्हॉट्सअ‍ॅपला दुसरे पर्याय शोधू लागले आहेत. युजर्स प्रायव्हसी फोकस्ड इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप Signal वर स्विच होत आहेत. 

Signal आणि WhatsApp मधील फरक :


सिग्नल अ‍ॅप युजरचा कोणताही डेटा कलेक्ट करत नाही. तर व्हॉट्सअ‍ॅपने आता युजर्सचा डेटा कलेक्ट करण्यास सुरुवात केली आहे. 

सिग्नल अ‍ॅप युजर्सचा केवळ मोबाईल नंबर घेतं. तर व्हॉट्सअ‍ॅप फोन नंबर, कॉन्टॅक्ट लिस्ट, लोकेशन, मेसेज हा संपूर्ण डेटा कलेक्ट करतं.

व्हॉट्सअ‍ॅपने नवी पॉलिसी आणली असून ती युजर्सला 8 फेब्रुवारीपर्यंत अ‍ॅक्सेप्ट करावी लागणार आहे. 

त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सध्या agree आणि not now असा पर्याय निवडता येईल. 

व्हॉट्सअ‍ॅपची सर्व्हिस ऑपरेट करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा कंटेन्ट फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल. 

युजर्सला नव्या पॉलिसीचा पॉप-अप येईल, त्याला अ‍ॅक्सेप्ट करावं लागेल, agree वर क्लिक केल्यानंतर कंपनीच्या नव्या पॉलिसीला तुमची सहमती असेल. दरम्यान, अ‍ॅक्सेप्ट न केल्यास अकाउंट डिलीट होणार असल्याचं बोललं जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post