MK Digital Line
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनावरून सध्या राजकारणही जोरात सुरू आहे. याच दरम्यान आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
आम आदमी पक्षाने शेतकऱ्यांसाठी मोफत वाय-फाय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी सिंघू सीमेवर केजरीवाल सरकार फ्री वाय-फाय हॉट स्पॉट्स लावणार असल्याची माहिती मिळत आहे.
आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
"खराब नेटवर्कमुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना इंटरनेट वापरण्यात अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी फ्री वाय-फाय हॉट स्पॉट्स लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे.
Post a Comment