MK Digital Line
डेटा प्रायव्हसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुगल आणि अॅमेझॉनला तब्बल 16.3 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला गेला आहे.
फ्रान्समधील डेटा प्रायव्हसीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेने गुगलवर 100 दशलक्ष युरो (12.1 कोटी डॉलर्स) आणि अॅमेझॉनला 35 दशलक्ष युरो (4.2 कोटी डॉलर्स) चा दंड ठोठावला आहे.
CNIL ने सांगितले....! :
- दोन्ही कंपन्यांच्या फेन्च वेबसाईटनं इंटरनेट युझर्सना ट्रॅकर अथवा कुकीजच्या बाबतीत मंजुरी मागितली नाही.
- ते जाहिरातींच्या उद्देशाने आपल्या आपण कंप्युटर्समध्ये सेव्ह झाल्या होत्या.
- दोन्ही कंपन्यांनी सप्टेंबर महिन्यात आपल्या वेबसाईट्स मध्ये बदल केले होते. परंतु ते बदल फ्रान्सच्या नियमांप्रमाणे योग्य नव्हते.
तीन महिन्यांचा कालावधी :
संबंधित संस्थेने गुगल आणि अॅमेझॉनला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. यामध्ये त्यांना आपली पद्धत बदलावी लादणार आहे. यामध्ये त्यांना ग्रांहकांना त्यांच्या डेटाचा वापर कसा कला जातो आणि कुकीजना ते कसं नाकारू शकतात हेदेखील त्यांना सांगावं लागणार आहे. मात्र असे न केल्यास त्यांना दररोज 1 लाख युरोचा (1 लाख 21 हजार 95 डॉलर्स) दंड भरावा लागणार आहे.
Post a Comment