MK Digital Line
जर तुम्ही कमीत-कमी रक्कम मेंटन केल्याशिवाय खातं उघडू इच्छित असाल तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्याठिकाणी अद्याप बँक नाही आहेत. या बँकेमध्ये शहरी भागातील पोस्ट ऑफिसमध्ये देखील खाते उघडता येईल. हे खाते पोस्टाच्या बचत खात्यापेक्षा वेगळे आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक खात्याला पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याशी जोडता येईल. ही बँक पूर्णपणे ऑनलाईन काम करते. अर्थात तुम्हाला खाते देखील ऑनलाईन उघडावे लागेल.
खात्याचे वैशिष्ट्य काय?
- यामध्ये 3 प्रकारची बचत खाती उघडण्याची सुविधा आहे. रेग्यूलर, डिजिटल आणि बेसिक सेव्हिंग अकाउंट.
- या तीनही खात्यांमध्ये ग्राहकांना 4 टक्के वार्षिक व्याज दिले जाते, मात्र व्याजाचे कम्पाउंडिंग तिमाही आधारावर केले जाते.
- तुम्ही रेग्यूलर खाते उघडणार असाल तर झिरो बॅलन्सवर खाते उघडता येईल. यामध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागणार नाही.
- SMS च्या माध्यमातून तुम्हाला ट्रान्झॅक्शनची माहिती देखील मिळेल.
- तुम्ही क्यूआर कोडच्या माध्यमातून विविध पेमेंट देखील करू शकता.
आपण IPPB द्वारे देण्यात आलेल्या एटीएम कार्डवर एक क्यूआर कोड देण्यात आला आहे, जो मोबाइलवरुन स्कॅन केल्यानंतर पासवर्ड किंवा खाते क्रमांकाशिवाय ओटीपीच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता.
Post a Comment