MK Digital Line
जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी भारतातून यंदा कोणत्या चित्रपटाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

अखेर याबाबत घोषणा झाली आहे. सर्वोत्कृष्ठ परदेशी भाषा चित्रपट विभागासाठी भारतातून अधिकृतरीत्या मल्याळी चित्रपट 'जलिकट्टू' ला ऑस्करसाठी पाठवण्यात येणार आहे.

'जलिकट्टू' या चित्रपटाची कथा दक्षिण भारतातील 'जलिकट्टू' या खेळावर आधारित आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने कौतुकाची थाप मिळवली होती.

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 14 सदस्यांनी 'जलिकट्टू'ची ऑस्करसाठी निवड केली आहे. या चित्रपटाची स्पर्धा देशातील 27 चित्रपटांशी होती. 

यामध्ये बिटरस्वीट, द डीसायपल, गुलाबो सिताबो, शिकारा, बुलबुल, कामयाब आदी चित्रपटांचा समावेश होता. 93 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 25 एप्रिल 2021 रोजी लॉस एंजेलिस येथे पार पडणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post