MK Digital Line
युजर्सना पेमेंट सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने आरोग्य विमा खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
आरोग्य विम्यापासून वंचित असल्याने त्यांना परवडणाऱ्या दरात विमा योजना खरेदीसाठी व्हॉट्सअॅप मदत करणार आहे.
व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस म्हणाले, भारतातील सुमारे 40 कोटी युजर्सना नवनव्या सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे.
एकमेकांशी संलग्न राहण्याबरोबर त्यांना सुरक्षित व्यासपीठ देणे आमचे कर्तव्य असल्याने डिजिटल व्यवहार अधिक स्वरुपात करावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
व्हॉट्सअॅप पेमेंटनंतर आरोग्य विमा योजना आणल्यानंतर पुढील काळात व्हॉट्सअॅपवर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
Post a Comment