MK Digital Line
शहरी भागात अतिवेगवान इंटरनेट सेवा देण्याबरोबरच देशाच्या अति दुर्गम, पहाडी भागात हाय स्पीड सेवा देण्याचे काम गुगलच्या 'तारा' प्रोजेक्ट मार्फत केले जाणार आहे. 

यामध्ये लाईट बीमच्या वापराने टेलीकास्ट कनेक्टीव्हिटी व हायस्पीड इंटरनेटसाठी सुपर टेक्नोलोजीच वापर केला जात आहे. 

हे तंत्रज्ञान गुंतागुंतीचे आहे. अतिशय बारीक म्हणजे अदृश्य बीमच्या सहाय्याने हवेत सुपर हाय स्पीड डेटा यात ट्रान्समीट केला जातो.

विशेष म्हणजे यासाठी केबलची गरज नाही. मोठमोठ्या इमारती, किंवा कोणत्याही दुर्गम, अडचणीच्या भागात सर्वर ट्रान्समीटर व रीसिव्हरमध्ये रेडीओ वेबऐवजी लाईट बीम पाठवले जातात. 

ग्राहक सध्या १ गिगा प्रतिसेकंदचा स्पीड मिळवू शकत असले तरी या तंत्रज्ञान वापराने ही क्षमता २० गिगा प्रती सेकंड इतकी वेगवान होऊ शकते. 

दरम्यान, हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी गुगल देशातील तीन मोठ्या कंपन्यांबरोबर सहकार्यसंदर्भात चर्चा करत असल्याची माहिती मिळते.

Post a Comment

Previous Post Next Post