MK Digital Line
पुढील वर्षी जानेवारीपासून गूगल पेद्वारे मनी ट्रान्स्फर करण्यासाठी शुल्क लागणार असल्याची बातमी आली होती. मात्र, भारतात हे शुल्क लागणार नसल्याचे गूगलने स्पष्ट केलं आहे.
भारतात गूगल पे ग्राहकांना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आहे. हा शुल्काबाबतचा नियम फक्त अमेरिका स्थित गुगल पे ग्राहकांसाठी असणार आहे.
दरम्यान, नुकतेच गूगल तुमच्यासाठी नवीन अँप घेऊन येत असून 'ट्रू कॉलर'ला आता गुगल रिप्लेस करण्याच्या तयारीत आहे.
‘Phone by Google’ चे नवीन व्हर्जन गूगल लाँच करण्याची तयारी केली आहे. या नवीन अॅपचे नाव गुगल कॉल असे असणार आहे.
आगामी मोबाइल अॅपमध्ये युजर्सला कॉलर-आयडी आणि स्पॅम कॉल थांबविण्याची सुविधा मिळणार असून या अॅपद्वारे ट्रू कॉलर अॅपला टक्कर देण्याची शक्यता आहे.
Post a Comment