MK Digital Line
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने 2020 मध्ये खूप सारे नवीन फीचर्स आणले असून व्हॉट्सअॅपवर नवीन स्टोरेज मॅनेजमेंट टूल पासून पेमेंट फीचर आणि डार्क मोडचा यात समावेश आहे.
▪️कार्ट : फीचरद्वारे युजर जास्तीत जास्त प्रोडक्ट्स आपल्या कार्टमध्ये अॅड करुन सहजपणे शॉपिंग करु शकतात. बिजनेस कॅटलॉगमध्ये ब्राउज करताना युजर्सना 'Add to Cart' आणि मेसेज बिजनेसचा पर्याय दिसणार आहे.
▪️अडवॉन्स्ड सर्च : फीचरद्वारे फाइल्सला वेगळं सर्च करण्याचे ऑप्शन युजर्संना मिळणार असून सर्च टॅप करताना फोटोज, टेक्स्ट, ऑडियो, जीफ, व्हिडिओज, लिंक्सचा पर्याय मिळतो. व्हिडिओ शोधण्यासाठी लिंक्स आणि टेक्स्ट मेसेजेमध्ये जास्त पाहावे लागत नाही.
▪️ग्रुप कॉल लिमिट : फीचरद्वारे व्हॉट्सअॅपवर मिळणाऱ्या व्हिडिओ कॉल तसेच व्हाइस कॉलिंग ऑप्शनमध्ये आतापर्यंत चार लोक एकत्र येवू शकत होते. आता ही संख्या 8 केली आहे.
▪️डार्क मोड : या फीचरच्या मदतीने फक्त डोळ्यांना आराम मिळणार असून बॅटरी सुद्धा वाचते. या फीचरला इनेबल केल्यावर सर्व सेक्शनचे बॅकग्राउंड डार्क ग्रे कलरचे होतात. डिस्प्ले सेक्शनमध्ये थीमवर टॅप करून युजर्संना Light, Dark आणि System Default हे तीन ऑप्शन मिळते.
▪️व्हॉट्सअॅप पेमेंट : हे ऑप्शन चॅट विंडोमध्ये अटॅचमेंटवर टॅप केल्यानंतर दिसते. या ठिकाणी पेमेंट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर बँक अकाउंट वरून याला लिंकला ऑप्शन मिळतो.
▪️स्टोरेज मॅनेजमेंट टूल : फीचरद्वारे अॅपला चांगले बनवण्यासाठी स्टोरेज मॅनेजमेंट टूल आल्याने आता फॉरवर्डेड फोटोज, व्हिडिओज आणि फाईल्स स्टोरेज मॅनेजमेंट सेक्शनमध्ये जावून पाहू शकतात. त्यांना डिलीट करून स्टोरेज क्लियर केले जावू शकते. वेगवेगळ्या चॅट्स मीडियाला सुद्धा डिलिट केले जावू शकते.
Post a Comment