MK Digital Line
दक्षिण आफ्रिकेतील कोरोना विषाणूशी संबंधित असलेला विषाणूचा आणखी एक प्रकार ब्रिटनमध्ये सापडल्याचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी जाहीर केले. 

या आधी कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार सापडलेला असतानाच आता हा प्रकार सापडल्याने खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा पुन्हा नव्याने प्रसार झाला होता, त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट मोठी असू शकते, असा इशारा दिला.

दक्षिण आफ्रिकेतील विषाणूशी संबंधित विषाणूचे दोन रुग्ण सापडले आहेत. हा प्रकारही जास्त पसरणारा असून तो आणखी उत्परिवर्तनानंतर तयार झालेला असावा. 

या विषाणूचे दोन रुग्ण सापडले असून दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांना पंधरा दिवस विलगीकरणात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post