MK Digital Line
इंटरनेटवर सध्या ऑनलाईन गेम्सची क्रेझ आहे, हजारो गेम इंटरनेटवर उपलब्ध आहेत. लहानग्यांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत अनेकांना असे गेम खेळायची सवय लागली. 

ऑनलाईन गेम्समुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा दावा करत लवकरच त्यावर बंदी आणण्याचे संकेत कर्नाटक सरकारने दिले आहेत.

कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी याबद्दल माहिती दिली. “ऑनलाईन गेम्सच्या नादात नागरिकांकडून कष्टाने कमावलेल्या पैशांचा अपव्यय होत आहे, त्यामुळे राज्यात लवकरच ऑनलाईन गेम्सवर बंदी आणली जाईल”, असे बोम्मई म्हणाले.

“ऑनलाईन गेम्सबाबत पालकांच्या आणि अन्य अेक लोकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्यात अशाप्रकारच्या गोष्टींना प्रोत्साहन मिळू नये यासाठी ऑनलाईन गेम्सवर बंदी आणण्याचा विचार आहे”, असं बोम्मई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

“विद्यार्थी, लहान मुलं, मुली दिवसभर गेम खेळण्यात व्यस्त असतात. इतकंच नाही तर मोठ्या व्यक्तीही ऑनलाईन गेम्सवर बरेच पैसे वाया घालवतायेत, हा एक प्रकारचा जुगार झालाय. 

ऑनलाईन गेम्सवर बंदी आणण्याच्या कर्नाटक सरकारच्या विचाराला राज्यातील विरोधी पक्षाकडूनदेखील पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेस नेते दिनेश गुंडु राव यांनी गृहमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post