MK Digital Line
टीम इंडियाचा संघ 27 नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या रणांगणात पुन्हा एकदा उतरणार आहे. भारताचा संघ यावेळी यजमान ऑस्ट्रेलियन संघाशी दोन हात करील. 

दोन देशांमध्ये चार कसोटी, तीन वन-डे व तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. याप्रसंगी टीम इंडियाचा संघ नव्या लूकमध्ये जगभरातील क्रिकेटप्रेमींना दिसणार आहे. 

नेव्ही ब्ल्यू रंगाची जर्सी घालून विराट कोहलीचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे तसेच टी-20 मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे.

बीसीसीआय व नाईकी यांच्यामधील करार या वर्षी संपुष्टात आला. त्यामुळे टीम इंडियाच्या किटसाठी बीसीसीआयला नवा स्पॉन्सर शोधावा लागला.

Post a Comment

Previous Post Next Post