महिला अंतराळवीर अंतराळातून करणार मतदान


MK Digital Line
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. 

अनुभव : नासामधील महिला अंतराळवीर ४१ वर्षीय कॅथरीन रुबिंस हिच्यासाठी मात्र या निवडणूक मतदानाचा अनुभव यावर्षी हटके असणार आहे. 

हक्क : कॅथरीन ऑक्टोबरच्या मध्याला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनसाठी अवकाशात उड्डाण घेणार आहे. विशेष म्हणजे ती अंतराळ स्टेशनमधूनच तिचा मतदानाचा हक्क बजावणार आहे. 

पहिलीच महिला : अंतराळातून मतदान करणारी कॅथरीन ही पहिलीच महिला अंतराळवीर ठरणार आहे.

कॅथरीनने यापूर्वी ७ जुलै २०१६ मध्ये प्रथम अंतराळात झेप घेऊन स्पेस स्टेशनवर ११५ दिवस मुक्काम केला होता. आता ती दुसऱ्या वेळी अंतराळ प्रवासाला जात आहे. 

मतदान गुप्त : कॅथरीन ३२२ किमी उंचीवरून मतदान करेल आणि नासा हे मतदान गुप्त राहील याची काळजी घेईल असे समजते. कॅथरीन या प्रवासात सहा महिने स्पेस स्टेशनवर राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post