MK Digital Line
WhatsApp कंपनीने आपल्या अॅपमध्ये अनेक बदल केले आहेत. अनेक फीचर्ससह नवीन इमोजी सुद्धा आले आहेत. व्हॉट्सअॅप युजर्संना सहज फोटो, व्हिडिओ, ऑडियो, जीफ फाईल आणि डॉक्यूमेंट्स सर्च करता येणार आहे.
आता मेसेजेस शिवाय मीडिया फाईल्स सर्च करणे सोपे झाले आहे. आधी युजर्संना मीडिया फाइल्स आणि टेक्स्ट साठी सिंगल सर्च ऑप्शन मिळत होता.
आता फाईल शोधण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. नवीन ऑप्शनमधून मेसेज किंवा फाईल युजर्संना शोधायचे असल्यास त्याला सिलेक्ट करून सर्च करता येवू शकते.
जर तुम्हाला फोटो सर्च करायचा असेल तर त्यावर टॅप करा. त्यानंतर सर्च टर्म लिहा. त्या संबंधित फोटो दिसतील. त्याप्रमाणे डॉक्यूमेंट सर्च करा. त्यावर टॅप केल्यानंतर त्याचे नाव टाइप करा, डॉक्यूमेंट्स समोर दिसतील.
Post a Comment