MK Digital Line 
येत्या 1 नोव्हेंबरपासून एलपीजी सिलेंडर, एसबीआय, डिजिटल पेमेंटचे नियम बदलणार आहेत. हे सर्व नियम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे आहेत. त्यावर एक नजर... 

ओटीपीशिवाय सिलेंडरची होम डिलेव्हरी नाही :

ग्राहकांना आता सिलेंडर ऑनलाईन बुक करताना पैसे भरावे लागतील. यानंतर ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलेव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागेल. अन्यथा ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही. 

घरगुती सिलेंडरच्या दरांमध्ये बदल :

येत्या 1 नोव्हेंबरपासून घरगुती सिलेंडरच्या दरांमध्ये बदल होणार आहे. यंदा सिलेंडरच्या दरात अधिक बदल होणार नाही, अशी शक्यता आहे. 

SBI कडून व्याजदरात कपात :

एसबीआयने बचत खात्यांवरील व्याजदर येत्या 1 नोव्हेंबरपासून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयने व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात करून तो 3.25 टक्क्यांवर आणला आहे.

डिजिटल पेमेंटवर शुल्क नाही :

येत्या 1 नोव्हेंबरपासून 50 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेची उलाढाल करणाऱ्या उद्योजक, व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट करणे बंधनकारक असणार आहे. रिझर्व्ह बँकेचा हा नियम पुढील महिन्यापासून लागू होईल. 

बँकांच्या वेळेत बदल :

राज्यातील बँका एकाच वेळा उघडतील आणि बंद (सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजता) होतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँकांना हा नियम लागू असेल.

Post a Comment

Previous Post Next Post