MK Digital Line
ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची रविवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. नौदलाच्या स्वदेशी स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएस चेन्नई येथून अरबी समुद्रातील लक्ष्याच्या यशस्वी लक्ष्यभेद करण्यात आला. 

यशस्वी चाचणी :

डीआरडीओने ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याने नौदलाच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे. 

सामर्थ्यात वाढ :

प्रतिकूल हवामानात दिवसा आणि रात्रीही जमीनीवरील, समुद्रातील आणि हवेतील लक्ष्यभेद करण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची असल्याने देशाच्या सैन्य दल सामर्थ्यात वाढ झाली आहे.

यशाची पायरी :

चीनशी असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान आपले सामर्थ्य वाढवत आहे. त्यात रविवारी यशाची आणखी एक पायरी गाठली आहे. 

सुरक्षा वाढणार :

हे क्षेपणास्त्र 400 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्याचा भेद करण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्रामुळे हिंदुस्थानच्या लढाऊ जहाजांची सुरक्षा वाढणार आहे.

सुपरसोनिक क्रूज :

याआधी डीआरडीओने ओडिशातील चांदीपूरमध्ये 30 सप्टेंबरला ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. ब्रह्मोस देशातील पहिले सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे.

क्षेपणास्त्राचा वापर पाणबुडी, लढाऊ जहाजे, लढाऊ विमाने आणि जमीनीवरूनही करता येणार आहे. हे क्षेपणास्त्र हिंदुस्थान आणि रशियाने संयुक्त उपक्रमाद्वारे विकसीत केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post