MK Digital Line
'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेतील शेवंता या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली होती. ही मालिका संपल्यापासून प्रेक्षक शेवंताला खूप मिस करत आहेत. पण शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.
शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पुनरागमन करणार आहे. झी युवा वाहिनीवरील आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय'मध्ये अपूर्वा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
पम्मी या भूमिकेतून अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीन बोल्ड करण्यासाठी सज्ज झालीय. या मालिकेची शैली विनोदी असून पम्मी ही या मालिकेला ग्लॅमरचा तडका देणार आहे.
Post a Comment