MK Digital Line
रशिया अंतराळातील एका विशेष कामगिरीसाठी सज्ज झाले असून उद्या 14 ऑक्टोबरला सकाळी 8.45 मिनिटाने रशियाचे सुपरफास्ट सोयुझ एमएस-17 हे अंतराळयान तीन अंतराळविरांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावत आहे.
विशेष : सोयुझ एमएस 17 हे यान केवळ तीन तासात म्हणजे मास्को लंडन विमान प्रवासाला जितका वेळ लागतो, त्यापेक्षा कमी वेळात अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहे.
पहिलेच अंतराळ यान :
अंतराळवीराना घेऊन 'या' वेगाने हा प्रवास करणारे सोयुझ पहिलेच अंतराळ यान आहे.
परतणार :
या अंतराळयानातून तीन अंतराळवीर जाणार आहेतच, मात्र त्याशिवाय अंतराळ स्थानकात अगोदरच गेलेल्या अंतराळवीरासाठी काही सामान सुद्धा यातून नेले जाणार आहे. हे यान पुढच्या वर्षी 9 एप्रिल रोजी पृथ्वीवर परत येईल असे समजते.
अल्ट्राफास्ट टू ओर्बिट फ्लाईट :
यान इतक्या प्रचंड वेगाने जाण्यासाठी त्यात अल्ट्राफास्ट टू ओर्बिट फ्लाईट प्लानचा वापर केला गेला आहे. काझाकीस्थान मधील बायकोनूर लाँचिंग स्टेशनवरून सोयुझ एमएस 17 झेपावेल.
रशियाचा पाहिला अंतराळवीर युरो गागरीन याने याच लाँचिंग स्टेशनवरून अंतराळात पाहिले यशस्वी उड्डाण केले होते. सोयुझ एमएस 17 उड्डाणाचे नेतृत्व क्रू कमांडर सर्गेई रीझीकोव्ह करणार आहे.
एअर लॉक :
या प्रवासात ही टीम दोन वेळा बाहेर येऊन सिस्टीम मॅनेजमेंट व भविष्यातील स्पेस वॉकसाठी एअर लॉक लावणार आहे.
Post a Comment