MK Digital Line
गुगलशी स्पर्धा करण्यासाठी पेटीएम कंपनीने आपले नवीन 'Mini App Store' लाँच केले आहे. गुगलने पेटीएमला प्ले स्टोअरमधून काही काळ काढून टाकले होते, त्यानंतर आता पेटीएमने स्वतःचे अ‍ॅप स्टोअर लॉन्च केले आहे. 

आतापर्यंत मार्केटवर मुख्यत्वे गुगलचे वर्चस्व होते, परंतु पेटीएमच्या मिनी अ‍ॅप स्टोअरच्या सहाय्याने वापरकर्त्यांना गुगल प्ले स्टोअर व्यतिरिक्त इतर पर्यायही उपलब्ध झाला आहे. 

मिनी अ‍ॅप स्टोअर HTML आणि जावास्क्रिप्ट सारख्या मुक्त स्त्रोत तंत्रज्ञानास इंटीग्रेट करणार असून याचा पेटीएम अ‍ॅप सक्रिय वापरकर्त्यांना एक्सेस देईल.

डेव्हलपर पेटीएम व्होल्ट आणि यूपीआयच्या माध्यमातून शून्य टक्के पेमेंट चार्जवर या प्लॅटफॉर्मवर अॅप्सचे वितरण करू शकतात. क्रेडिट कार्डद्वारे हे करण्यासाठी अॅप डेव्हलपर्स 2 टक्के शुल्क भरावे लागेल. 

दरम्यान, काही यूजर्ससाठी पेटीएम अ‍ॅप स्टोअर बीटामध्ये काही काळ उपलब्ध होता. मात्र, अॅप युजर्सना खूप आवडले आणि 12 दशलक्ष व्हिजीट्स मिळाल्याचे कंपनीने स्पष्ट केलं.

Post a Comment

Previous Post Next Post