आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नजीब ताराकाईच्या मृत्यू
MK Digital Line
अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय तडाखेबाज खेळाडू क्रिकेटपटू नजीब ताराकाई याचे आज निधन झाले आहे.
धक्का : नजीब ताराकाईच्या निधनाने अफगाणिस्तानसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात मोठा धक्का बसला आहे.
कोमात : नजीब ताराकाई याचा शुक्रवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर तो कोमात गेला होता.
श्रद्धांजली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने देखील नजीब ताराकाईच्या मृत्यूनंतर ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
29 वर्षीय नजीब यानं एक वन डे आणि 12 ट्वेंटी-20 सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2017 मध्ये त्यानं आयर्लंड विरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यांत 90 धावांची खेळी केली होती.
अखेरचा सामना : त्या सामन्यात अफगाणिस्तानने 17 धावांनी आयर्लंडला पराभूत केले होते. 2019 मध्ये त्यानं बांगलादेशविरुद्ध ढाका येथे अखेरचा ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
Post a Comment