MK Digital Line
लिओनेस मेसीने पेनल्टीवर पहिला गोल केल्यानंतर बार्सिलोनाने जोरदार ‘गोलधडाका’ सुरू केला. त्यामुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये बार्सिलोनाने बुधवारी हंगेरीच्या फेरेन्कवारोस संघाचा ५-१ असा धुव्वा उडवला. मँचेस्टर युनायटेड आणि युव्हेंटस या संघांनी आपापले सामने जिंकले.
विजय : मेसीने २७ व्या मिनिटाला पेनल्टीवर बार्सिलोनाचे खाते खोलले, त्यानंतर अन्सू फाटी, फिलिपे कुटिन्हो, प्रेडी आणि औसमाने डेम्बेले यांनी गोल करत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला.
विक्रम : मेसीने चॅम्पियन्स लीगमधील ११६ व्या गोलची नोंद केली. सलग १६ मोसमात किमान एक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला.
मार्कस रॅशफोर्ड मँचेस्टर युनायटेडसाठी तारणहार ठरला. त्याने ८७ व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे युनायटेडने गतउपविजेत्या पॅरिस सेंट जर्मेनचे आव्हान २-१ असे परतवून लावले.
कोरोनाची लागण झाल्यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या फुटबॉलपासून दूर असला तरी युव्हेंटसला त्याची उणीव जाणवली नाही.
विजय : अॅटलेटिको माद्रिदकडून कर्जावर आलेल्या अल्वारो मोराटाने ४६ व्या आणि ८४ व्या मिनिटाला गोल करत युव्हेंटसला डायनामो कियिव्हवर २-० असा विजय मिळवून दिला.
बरोबरी : चेल्सी आणि सेव्हिला यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. रेन्नेस आणि क्रासनोडर यांच्यातही १-१ अशी बरोबरी झाली.
Post a Comment