MI vs KKR : मुंबईने विजयाचं खातं उघडलं

Mi vs KKR

MK Digital Line

रोहित शर्माच्या शानदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता संघाचा 49 धावांनी पराभव करत विजय साकारला. 

खात उघडलं : पहिल्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता पण अखेर आज मुंबईने विजयाचं खात उघडलं. रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला.

195 धावा : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 195 धावा ठोकल्या. 

पाठलाग : 195 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा डाव 9 बाद 146 धावांत आटोपला.

पहिला विजय : मुंबई इंडियन्सने कोलकत्ता वर 49 धावांनी मात केली. यासह मुंबई संघाने आयपीएल हंगामातील पहिला विजय नोंदविला आहे.

मुंबईकडून बोल्ट, बुमराह, पैटिन्सन आणि चहर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर केराॅन पोलार्डने 1 बळी घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post