अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' मध्ये वाणी कपूर
MK Digital Line
अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'मध्ये वाणी कपूरही असणार आहे. ब्रिटनमध्ये लवकरच ती या सिनेमाच्या शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे.
या सिनेमाच्या शूटिंगसाठी आता आपल्याला दम धरवत नाही, असे तिने नुकतेच सांगितले.
'बेल बॉटम'ची टीम आणि अक्षय कुमार यापूर्वीच स्कॉटलंडला जाऊन दाखल झाले आहेत. वाणी याच आठवड्यात या सगळ्या टीमला सामील होणार आहे.
'बेल बॉटम'साठी अक्षय कुमारची हिरोईन म्हणून वाणीची अगदी अलीकडेच निवड झाली.
कोरोनाच्या साथीमुळे थंडावलेल्या फिल्म इंडस्ट्रीच्या कामाला पुन्हा एकद सुरुवात होते आहे, त्याबद्दल तिला आनंद होतो आहे.
Post a Comment