रिलायन्स जिओ आणणार स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन


MK Digital Line
रिलायन्स जिओ कंपनी या वर्ष अखेरीस स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन डेटा पॅकसोबत लाँच करणार आहे.

गूगल कमी किंमतीच्या 4 जी किंवा 5 जी स्मार्टफोनसाठी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम (OS) तयार करेल जे रिलायन्स डिझाइन करणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केलं होत.

रिलायन्स इंडस्ट्रीज टेलिकॉम युनिट हे गूगलच्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येणाऱ्या कमी किंमतीच्या 10 कोटी स्मार्टफोनच्या निर्मितीचे आउटसोर्स करणार आहे. 

जिओचे नवीन स्मार्टफोन बाजारात येतील, तेव्हा शाओमी, रियलमी, ओप्पो आणि व्हिवो सारख्या चीनी स्मार्टफोन निर्माता ब्रँडसमोर एक आव्हान उभे राहणार आहे.

दरम्यान, सध्या भारतात विकल्या गेलेल्या दर 10 पैकी 8 स्मार्टफोन चिनी कंपन्यांनी बनवलेले असतात.

Post a Comment

Previous Post Next Post